भारतीय जनता पार्टी गोंदिया जिल्ह्याची विस्तृत बैठक जलाराम लॉन, गोंदिया येथे मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाली.या बैठकीमध्ये सेवा पखवाडा 2025 च्या पार्श्वभूमीवर विविध सेवा उपक्रमांचे नियोजन, जिल्ह्यातील संघटनात्मक कार्य, बूथ बांधणी, पक्ष धोरणांचा प्रसार, जनतेशी संवाद वाढविणे आणि आगामी निवडणूक तयारी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.