सरपंच चंद्रकुमार बहेकार यांना राष्ट्रीय परेड समारंभाचे आमंत्रण स्वतंत्रदिनी राजधानी दिल्लीत सहकुटुंब राहणार उपस्थीत, त्यांच्या निवडीमुळे गोंदिया जिल्ह्याचा वाढला गौर १५ ऑगस्ट २०२५ रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिन राष्ट्रीय परेड समारंभास विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी स्मार्ट ग्रामपंचायत भजेपारचे उपक्रमशील सरपंच तथा सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकुमार बहेकार यांना मानाचे आमंत्रण मिळाले आहे. विशेष म्हणजे, ते सहकुटुंब या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहणार आह