पालघर तालुक्यातील वांदिवली गावानजीक एसटी बस आणि हायवा ट्रकची धडक झाल्याने अपघात घडला आहे. पालघहून नागझरीच्या दिशेने जात असलेल्या एसटी बस आणि समोरून येणाऱ्या हायवा ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने अपघात घडला. या अपघातात बस आणि ट्रकचे चालक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र ट्रक आणि एसटी बस दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.