धुळे शहरातील पारोळा रोडवर ५ सप्टेंबर रोजी रात्री मुसळधार पावसामुळे घर कोसळून गौरव प्रल्हाद रनमळे (३७) यांचा मृत्यू झाला. घराच्या पुढील भागात झोपलेल्या अवस्थेत भिंत व छत अंगावर कोसळल्याने ते गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी ढिगाऱ्यातून बाहेर काढून रुग्णालयात नेले, मात्र उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. जुन्या घराची दुरवस्था आणि पावसामुळे ही दुर्घटना घडल्याचे समोर आले.