धुळे तालुक्यातील नेर गावातील मोटरसायकल व पाण्याच्या मोटारींच्या चोरीच्या घटनांवर पोलिसांनी यशस्वी कारवाई केली. कैलास जाधव, युसुफ सैय्यद व सुनंदाबाई जाधव यांच्या तक्रारीनंतर पोलिस निरीक्षक धनंजय पाटील यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे निलेश माळी (३२) व चंद्रकांत अहीरे (३५) यांना अटक करून चोरीस गेलेली मोटरसायकल व पाण्याची मोटर जप्त करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.