पालघर- मनोर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दुचाकीचा अपघात घडला आहे. रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे या खड्ड्याचा व रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार महिलेची दुचाकी खड्ड्यात आदळली आणि दुचाकी रस्त्यावर स्लिप झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघाताचा हा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या या दुचाकी अपघाताचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.