उदगीर येथील शासकीय विश्राम ग्रह येथे १० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता उदगीर,जळकोट,देवणी तालुक्यातील बंजारा बांधवांची बैठक पार पडली,नुकताच शासनाने मराठा समाज बांधवांना हैद्राबाद गॅजिटीअर नुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश निर्गमित केला आहे,तर हैद्राबाद गॅजिटीअर मध्ये बंजारा समाजाची एसटी म्हणून नोंद असून मराठा बांधवांना हैद्राबाद गॅजिटीअर लागू होत असेल तर महाराष्ट्रातील बंजारा समाजालाही हैद्राबाद गॅजिटीअर शासनाला लागू करावेच लागेल यासाठी बंजारा समाज आंदोलनाची दिशा ठरविणार आहे