तालुका डीवाय एफआय, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भाकपा, जनहितवादी महीला संघटनेच्या वतिने जनतेच्या विविध अडीअडचणी व मागण्यांबाबत पेठ येथील तहसिल कार्यालया समोर ठिय्या आंदोलन छेडण्यात आले. बलसाड रोडवरून हातात लाल बावटा घेऊन घोषणा देत मोर्चा काढण्यात आला. या आदोंलनात प्रामुख्याने जनतेला भेडसावणा-या विविध प्रश्नांवर चर्चा करून त्यांची सोडवणूक करण्यात यावी या करिता सबंधित विभागांच्या विभाग प्रमुखांशी चर्चा झाली.