वाहतूक अपघात कमी करण्याच्या उद्देशाने भंडारा पोलीस दलातर्फे "माझा रस्ता, माझी जबाबदारी" हा जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत नुकताच एक जनजागृती व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला असून तो 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओतून "नशा करून वाहनचालना केल्यास ते केवळ कायद्याच्या दृष्टीनं गुन्हा नाही तर जीवावरही बेतू शकते" हा प्रभावी संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात आला आहे.