ग्रीन धुळे वृक्ष टीमच्या वतीने चांडक फार्म गोंदूर रोड येथे आयोजित सीडबॉल निर्मिती कार्यशाळेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत शेकडो पर्यावरणप्रेमींनी सहभाग घेतला.या कार्यशाळेत सहभागी नागरिकांनी १५ ते २० हजार सीडबॉल तयार केले. सीडबॉल म्हणजे बीजांनी भरलेले मातीचे गोळे, जे पावसाळ्यात मोकळ्या जागांमध्ये फेकून सहज वृक्षारोपण करता येते.