अहिल्यानगर सरकारला सद्बुद्धी देवो आणि जरांगे यांचं उपोषण लवकर सुटो ; खासदार निलेश लंके यांची गणरायाकडे प्रार्थना Anc :- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुंबईत मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाबाबत खासदार निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने नोटिसा बजावण्यापेक्षा ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. सरकारला भिजत गोगंड ठेवायचं आहे आणि जनतेला वेठीस धरण्याचं काम सरकार करत आहे. खरंतर तामिळनाडूच्या धर्तीवर कोणाच्या ताटातलं हिसकावून न घेता आरक्षणाची मर्यादा वाढवता येऊ शकते.