तीन अल्पवयीन मुलांना मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल 📍 संगमनेर तालुका कुरण खांजापूर परिसरात रस्त्याने जात असलेल्या तीन अल्पवयीन मुलांना अडवून लाथा-बुक्क्यांनी तसेच काठीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या मारहाणीमध्ये तिघे मुलं जखमी झाले आहेत. सुलतान शकील मदारी, जबीउल्लाह सुफियान शेख आणि अरगम सोफियान शेख हे मित्राच्या घरी जात असताना पोपट सातपुते व किसन सातपुते यांनी त्यांना अडवून मारहाण केली.