विरार पोलीस ठाणे हद्दीतील फुलपाडा परिसरात राहणाऱ्या मनीष झा या आरोपीला परिमंडळ 3 पोलीस उपायुक्त यांच्या आदेशानुसार पालघर ठाणे रायगड मुंबई शहर मुंबई उपनगर या जिल्ह्यातील कार्यक्षेत्रातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते. मात्र हा आरोपी रविवारी प्रथमेशनगर परिसरात पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतले आहे आदेशाचा भंग केला म्हणून विरार पोलीस ठाण्यात सदर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.