माजी मंत्री व विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार यांच्या भंडारा जिल्हा दौऱ्यादरम्यान एक अनपेक्षित प्रसंग घडला. जिल्हा विश्रामगृहात पालकमंत्री पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. या दरम्यान विजय वडेट्टीवार यांना पालकमंत्री भोयर उपस्थित असल्याची माहिती मिळताच त्यांनी 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास थेट विश्रामगृह गाठत त्यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी गळाभेट घेऊन आपसातील आपुलकी व्यक्त केली.