गणेशोत्सवाला आज पासून प्रारंभ झाला असून सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पहावयास मिळत आहे लाडक्या बाप्पांचे आगमन घरोघरी त्याचप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये झाले असून त्यांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात 11688 गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली असून यामध्ये 9776 घरगुती तर 1912 सार्वजनिक गणेश मूर्तींचा समावेश आहे.