वर्धा जिल्ह्यात अवैध दारू तस्करीचे रॅकेट चालवणाऱ्यांवर पोलिसांनी जोरदार कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने एका मोठ्या कारवाईत २७ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यात देशी आणि विदेशी दारूसह बिअर आणि दोन महागड्या गाड्यांचा समावेश आहे. या प्रकरणी एकूण सात आरोपींवर दारूबंदी, मोटार वाहन आणि बालकामगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे आज 24 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे.