प्रादेशिक हवामान विभाग मुंबई कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात शनिवारी मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.