जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांचा सत्कार सोहळा 23 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास अखिल सभागृह, गणेशपुर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी शिक्षकांनी आपल्या कार्यातील अनुभव मांडले. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सर्व शिक्षकांचे कौतुक करण्यात आले.