मौजे खारशेत भावे श्रीवर्धन येथे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन आज शुक्रवार दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २ च्या सुमारास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याहस्ते संपन्न झाले. या रस्त्याच्या उभारणीमुळे ग्रामस्थांना अत्यावश्यक सोयीसुविधा उपलब्ध होतील तसेच गावाच्या पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वाची वाढ होईल. या प्रसंगी ग्रामस्थ मंडळी, महिला मंडळ, तरुण मित्र मंडळ, तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार बंधू आणि मान्यवर उपस्थित होते.