नांदुरा तालुक्यातील खेडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे शाळकरी मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या साथीच्या आजारासाठी वातावरण पोषक असल्यामुळे व या शाळेत पाणी चाचलेले असल्यामुळे डासाचे उत्पत्ती होऊन डेंगू सारखा भयंकर आजार होऊ शकतात. याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी येथील गावकऱ्यांनी केली आहे.