अहिल्यानगर मध्ये कानेटिक कंपनीतील कामगार गायकवाड याला कंपनीतील मॅनेजर गुळवे यांनी मारहाण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे या प्रकरणात अहिल्यानगर पोलिसांनी आरोपीला पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांनी पीडित कामगारांची भेट घेतली आणि पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढले यावेळी त्यांनी चेतावणी दिली की कामगारांना त्वरित न्याय द्या अन्यथा अहिल्यानगर मध्ये भव्य मोर्चा काढण्यात येईल