बाभूळगाव तालुक्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी संत धार पावसामुळे नदीला आलेल्या पुरामध्ये कोटंबा येथील अर्जुन सखुजी उईके वय 66 वर्ष हे पाण्यातवाहून गेले होते आणि त्यांचे प्रेत दुसऱ्या दिवशी नदीपात्रात आढळून आले होते.जिल्हाधिकारी विकास मीना यांनी मृतकाच्या नातेवाईकांना तातडीने मदत देण्याचे निर्देश दिल्यावर महसूल यंत्रणेने तातडीने प्रकरण तयार करून चार लक्ष रुपयाचा निधी मंजूर करून घेतला व सदर मृतकाच्या नातेवाईकांच्या खात्यामध्ये हा निधी वळता केला.