जयगड येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ०६ जून २०२४ रोजी रात्री ११:०० वाजता कपड्याची बॅग घेऊन घरातून निघालेल्या २८ वर्षे तरुणाचा खून झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून मृतदेह आंबा घाटात दरीत फेकून दिल्याची कबुली आरोपीने दिली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.