दिवाळी आणि छटपूजा, नवरात्री तसेच दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. पुणेकरांना नागपूर, लातूर तसेच उत्तर भारतातील विविध प्रमुख शहरांमध्ये सहज प्रवास करता यावा यासाठी एकूण 300 विशेष गाड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष गाड्यांमुळे हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार असून, गर्दीचे व्यवस्थापन करण्यात मदत होणार आहे.