हिंगणघाट :आधार फाऊंडेशन व हिंगणघाट नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण बचावासाठी कृत्रिम गणेश विसर्जन जलकुंडाची निर्मीती स्थानिक न्यू म्युनिसिपल हायस्कृल, गुरुनानल वॉर्ड, सिंधी कॉलनी येथे करण्यात आली आहे.याठिकाणी शहरातील घरगुती गणपतीचे याठिकाणी विसर्जन करणे सुरू केले आहे. शहरात सार्वजनिक व रगुती गणेश मुर्तीची प्रतिष्ठापणा आपण मोठ्या भक्तीभावाने करीत असतो पण ह्या मुर्ती बनविण्यासाठी माती, विविध रासायनिक रंग, प्लॉस्टर ऑफ पॅरिस चा वापर अति प्रमाणात वापर होत आहे.