रुपाली चाकणकर या चेकाळल्या आहेत, दोन महिन्यांपासून सरकारवर आम्ही हल्ला करतोय त्यामुळे रोहिणी खडसे आणि माझं तोंड दाबण्याचे उपद्वाप सरकारचे चालू आहेत. माझ्या जावई दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण रुपाली चाकणकर यांना हे सगळं सांगण्याचा अधिकार कोणी दिला? रुपाली चाकणकर तपास अधिकारी कधी झाल्या? मानवी तस्करीमध्ये नाशिकचं हानी ट्रॅप प्रकरण येत नाही का? मंत्री हानी ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत, त्याच्यावर तुम्ही बोलत नाहीत का? असा हल्लाबोल एकनाथ खडसे यांनी केला