नळदुर्गात घरफोडी; 3 लाख 70 हजारांचा ऐवज लंपास नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील हंगरगा नळ येथील दयानंद प्रकाश चौगुले (वय 48) यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली आहे. ही घटना १ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० ते २ सप्टेंबरच्या पहाटे ५ वाजेच्या दरम्यान घडली. चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाट फोडले व त्यातून सुमारे १३५ ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम १ लाख रुपये असा एकूण ३ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी दयानंद चौगुले यांनी नळदुर्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.