भुसावळ शहरातील सावळे नगर भागातील एक इसम मोठ्या गुन्ह्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात गावठी कट्टा बाळगून असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी संशयितास गावठी कट्ट्यासह ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. २८ सप्टेंबर रोजी बाजारपेठ पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली.