धुळे देवपूरमध्ये सराफा व्यावसायिक विनय जैन यांच्यावर गोळीबार करून साडेतीन किलो सोने लुटल्याप्रकरणी धुळे स्थानिक गुन्हे शाखेने उलगडा केला आहे. हजारो सीसीटीव्ही तपासून आरोपींचा माग काढला असता ते उत्तरप्रदेशच्या प्रतापगढ तुरुंगात अटकेत असल्याचे समोर आले. त्यानंतर मोहंमद शहरेयार खान व दिलशान शेख यांना ताब्यात घेऊन २४.५१ लाखांचे सोने, कार व गावठी पिस्तूल जप्त केले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.