मेव्हनी व माझ्या नात्याविषयी गावात चर्चा का करता अशी विचारणा केल्याच्या वादातून तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना हरणी येथे घडली असून याबाबत २० ऑगस्ट रोजी अमडापूर पोलिसांनी ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हरणी येथील आशिष ज्ञानेश्वर राठोड (२६) याने गावातीलच अंकुश राठोड व सुरज रोहिदास चव्हाण यांना मेव्हणी व माझ्या नात्याबाबत गावात चर्चा का करता असे म्हटले असता यातून उद्भवलेल्या वादातून सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अमडापूर पोलीस करीत आहे.