दापोली तालुक्यातील हर्णे समुद्रकिनारी सकाळी एक डॉल्फिन मृतावस्थेत आढळला आहे. स्थानिक मच्छीमार बांधवांना हा डॉल्फिन समुद्रकिनारी दिसताच त्यांनी त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र डॉल्फिनला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचे प्राण वाचवण्यात अपयश आले. सध्या या घटनेची माहिती मत्स्य व्यवसाय विभागाला देण्यात आली असून, डॉल्फिनच्या मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी संबंधित विभागाकडून तपास सुरू आहे. स्थानिकांमध्ये यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे