ओझर येथील नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासी वाहतुकीला दिवसेंदिवस मोठा प्रतिसाद लाभत असून शनिवार दिनांक सात रोजी या विमानतळावरून एकाच दिवशी एक हजार तीनशे चौतीस जणांनी देशभरात प्रवास केला. हा या विमानतळाचा आजवरचा उच्चांक असल्याची माहिती निमाचे उपाध्यक्ष मनीष रावल यांनी आज दि. 10 रोजी सायंकाळी पाच वाजता नाशिकमध्ये दिली आहे. इंडिगो या आघाडीच्या कंपनीकडून नाशिक विमानतळावरून प्रवासी विमानसेवा दिली जात असून या विमानसेवेला मोठा प्रतिसाद लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.