बीडच्या स्वराज्य नगर परिसरात चाकूने हल्ला करून एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत तरुणाचे नाव विजय सुनील काळे असून त्याचे वय २५ वर्षे होते.बुधवार दि.3 सप्टेंबर रोजी पहाटे, 3 च्या सुमारास अज्ञात व्यक्तीने विजय काळे याच्या छाती आणि पोटावर चाकूने वार केले. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला.घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, खुनाचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.शिवाजीनगर पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.