मतदार अधिकार यात्रे' दरम्यान काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल समर्थकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या शिवीगाळांवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास प्रतिक्रिया दिली. एखाद्या चांगल्या उपक्रमाची बदनामी करण्यासाठी, यात्रेला बदनाम करण्यासाठी आणि राहुल गांधींना लक्ष्य करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते. हा आमचा ठाम संशय आहे. महाराष्ट्रात हे लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात, हे आम्हाला माहिती आहे. यात सहभागी असलेले त्याचेच लोक असण्याची शक्यता आहे