मुंबई-गोवा महामार्गावरील हातीवले येथे एका बोलेरो पिकअप गाडीतून विनापरवाना गुरांची वाहतूक करताना एका व्यक्तीला पकडण्यात आले आहे. राजापूर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २० सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास घडली. वैभव वसंत साटलकर (वय ३५, रा. तेरसे, बांबर्डे, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. साटलकर हा त्याच्या ताब्यातील एम एच ०७ एसे ३१ ८३ या क्रमांकाच्या बोलेरो पिकअप गाडीतून गुरांची वाहतूक करत होता.