सततच्या पावसामुळे प्रत्येक घरोघरी रुग्ण आढळून येत आहे त्यामुळे आर्णी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली आहे परंतु रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होतांना दिसत आहे त्यामुळे रुग्णांची होणारी हेळसांड थांबवा अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीने वैद्यकीय अधीक्षक यांना दिले आहे रुग्ण रुग्णालयात येते मात्र त्याला थेट यवतमाळला रेफर करण्यात येते डॉक्टर रुग्णांना पेपर वरती सर्व औषध गोळ्या लिहून देतात पण औषधी वाटप चे कर्मचारी काही औषधी नाही आहे असे कारण सांगून बाहेरून औषधी आणायला लावता