उदगीर शहरातील येणकी मानकी रोडवर एकाला तु दारु का पित नाहीस म्हणून हातावर व पाटीवर मारुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी ३१ ऑगस्ट रोजी पहाटे दोनच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३० ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास शहरातील येणकी मानकी रोडवरील म्हशीच्या बाजर जवळ फिर्यादी व त्याचे मित्र बबु अवेज पटेल हे तेथे जाऊन बसले असता आरोपीने तू दारू का पित नाहीस म्हणून कोयत्याने मारून गंभीर जखमी केले