केंद्रीय गृहमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शहा यांनी त्यांच्या कुटुंबासह आज शनिवार दिनांक ३० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १.१५ मिनिटाच्या सुमारास अंधेरी पूर्व येथील मोगरेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे दर्शन घेतले. यावेळी त्याच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते.