सुटकेसमधील महिलेच्या प्रेताचा उलगडा – पतीच निघाला खूनी ! लातूर पोलिसांची मोठी कामगिरी – उत्तर प्रदेशातील पाच जण अटकेत ल: चाकूर तालुक्यातील शेळगाव फाटा – तिरू नदी पुलाखाली २४ ऑगस्ट रोजी आढळलेल्या सुटकेसमधील महिलेच्या प्रेताच्या गूढाचा उलगडा लातूर पोलिसांनी अवघ्या दहा दिवसांत केला आहे. या प्रकरणात पतीच खुनी असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, त्याच्यासह उत्तर प्रदेशातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे.