वैजापूर खंडाळा रोडवर जरूळ फाट्याच्या जवळ एका ट्रॅक्टरला पाठीमागून दुचाकी धडकल्याने एक वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवार रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली असून घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक वाहेद पठाण यांनी तात्काळ जखमीस रुग्णवाहिकेच्या मदतीने खासगी रुग्णालयात दाखल केले होते.यातील जखमी व्यक्तीचे नाव मात्र कळू शकलेले नाही.