धुळ्यात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ स्टोरी टाकून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला चाळीसगाव रोड पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद नूर शेख राहणार मिल्लत नगर, धुळे असे अटक करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. या कारवाईमुळे शहरात सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्यांवर वचक बसणार आहे.