12 सप्टेंबरला दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ऍग्रो व्हिजन कार्यशाळा राष्ट्रीय कृषी प्रदर्शन व परिसंवाद नागपुरात 21 ते 24 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. याबद्दलची माहिती पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हॉटेल सेंटर पॉइंट येथे दिली आहे. येथे शेतकऱ्यांसाठी विविध परिसंवादाची विशेष मेजवानी असणार आहे.