वसई विरार शहर महानगरपालिकेचा आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी विरार येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळाला भेट देत पाहणी केली. घटनास्थळी उपस्थित एनडीआरएफ, अग्निशमन दल बचाव पथकासोबत चर्चा करून बचाव कार्य लवकर पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. दुर्घटनेतील जखमींची रुग्णालयात आयुक्तांनी भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.