राज्यातील गोमांस बंदीच्या विरोधात राज्यभरात कुरेशी समाजाने जनावरांच्या बाजारावर बंदी घातली होती. याबाबत राज्यभर कुरेशी समाजाकडून मोर्चा काढले जात आहेत. यावर राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांना माध्यमांनी विचारले असता त्यांनी शासनाने कत्तलखाने बंद करण्याचा आदेश दिला नसल्याचे सांगितले. परंतु देशी गोवंशीय जनावरांची कत्तल होणार नाही यावर ठाम असल्याचे मुंदडा यांनी सांगितले.