पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडून एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणी दाखल झालेला गुन्हा खोटा असल्याचा दावा एडवोकेट किरण घोडके यांनी केला आहे. आज शनिवार, दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारास पंढरपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा खुलासा केला. घोडके यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या मुलाचा आवाज बुलंद करण्यासाठी त्यांनी भूमिका घेतली असून यामुळेच त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचे सांगितले.