मेहकर व लोणार तालुक्यांसह संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा व शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी रु. ५० हजार म्हणजेच प्रति एकरी रु. २० हजार अनुदान तसेच इतर अनुषांगिक लाभ देण्यात यावेत, अशी ठोस मागणी शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सिद्धार्थ खरात यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन केली.