मराठा आरक्षणाबाबत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे वक्तव्य आज दि २९ ऑगस्ट रोजी दुपारी दिड वाजेपासून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. "सरकारकडे काहीच नाही, मग आरक्षण कसे देतील? मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारा मी होतो, बाकीच्यांनी फक्त लव्ह लेटर लिहिलेत," असे त्यांनी म्हटले आहे. तसेच ओबीसी आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देणे शक्य नसल्याचेही जाधव यांनी स्पष्ट केले