लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांनी मत चोरीचा आरोप केला असून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप महायुती सरकार मतचोरी करून सत्तेत आल्याचा आरोप केला आहे. या मत चोरी विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने पालघर रेल्वे स्थानक परिसरात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. यावेळी नागरिकांच्या स्वाक्षरी घेऊन मतचोरीचा विरोध दर्शवण्यात आला. काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते