नागपूर शहरात प्रथमच चापडा या अत्यंत विषारी सापाची नोंद झाली आहे. भरतवाडा परिसरात एका घराच्या वेलीवर हा साप दिसला. वाइल्डलाइफ वेल्फेअर सोसायटीच्या सर्पमित्रांनी त्याला सुरक्षितरित्या पकडून, 'ट्रान्झिस्ट ट्रीटमेंट सेंटर'मध्ये दिले आहे.गुरुवार, २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:३० वाजता भरतवाडा येथील रहिवासी विकास तुमसरे यांनी सर्पमित्र अभिषेक रहांगडाले यांना फोन करून त्यांच्या घराजवळील वेलीवर साप दिसल्याची माहिती दिली.