काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर वोट चोरीचा आरोप करून निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभ केलं होतं. मात्र आता या प्रकरणात शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार देखील पुढाकार घेणार असल्याचं मुंब्रा कळवा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी 3च्या सुमारास सांगितले. महाराष्ट्रातल्या सर्व मतदारसंघातील वोट चोरी शरद पवार उघडकीस आणणार असल्याचही आव्हाड यांनी सांगितलं.